Mumbai Shivaji Park मोकळचं राहणार? दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटांचा अर्ज फेटाळण्याची शक्यता

शिवसेनेतल्या ऐतिहासिक बंडानंतर मुंबईतल्या शिवाजी पार्कवर कुणाचा दसरा मेळावा होणार, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा? या प्रश्नाच्या उत्तराची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. पण हाती आलेल्या माहितीनुसार, ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांनी शिवाजी पार्कच्या आरक्षणासाठी केलेले अर्ज मुंबई महापालिकेकडून फेटाळण्यात येण्याची शक्यता आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देऊन कोणत्याही गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी देऊ नये असं मत पोलीस अधिकाऱ्यांनी दिलं असल्याचं कळतं. त्यामुळं मुंबई महापालिकेनं ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांचे अर्ज फेटाळण्याचा निर्णय घेतला तर दसऱ्याला शिवाजी पार्क मैदान मोकळंच राहण्याची शक्यता आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola