15 ऑक्टोबर ग्रथालयं आणि अभ्यासिका सुरु होतील, महाराष्ट्र ग्रंथालय संचलनालयाच्या संचालिकांची माहिती
राज्यातील ग्रंथालय, अभ्यासिकासाठी गाईडलाइन्स तयार आहेत. ग्रंथालय सुरु करण्यास आता आपण पूर्णपणे तयार आहोत. गाईडलाईन्स तयार आहेत. फक्त आता शासन निर्णय जाहीर झाला की ग्रंथालय, अभ्यासिका राज्यभर सुरु होतील, अशी माहिती महाराष्ट्र ग्रंथालय संचलनालयाच्या संचालिकांची शालिनी इंगोले यांनी दिली. या गाईडलाईन्स आम्ही 10 सप्टेंबरलाच उच्च व तंत्रशिक्षण विभाग सचिवांना पाठवल्या आहेत. मात्र, या उच्च व तंत्रशिक्षण विभाग त्यासोबत ग्रंथालय संचलानलाय यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह केसेस वाढल्या. स्वतः मंत्री उदय सामंत पॉझिटिव्ह आले. त्यामुळे ग्रंथालय सुरु करण्यास उशीर झाला आहे, असंही त्यांनी सांगितलं.