Section 144 | मुंबईत 9 मार्चपर्यंत जमावबंदी, दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर निर्णय
Continues below advertisement
दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनीही खबरदारी म्हणून 9 मार्च 2020 पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करता येणार नाही. समारंभ किंवा काही कार्यक्रमांना मात्र यामधून सूट देण्यात आली आहे. तसंच चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि शासकीय कार्यालयांनाही यातून वगळण्यात आलं आहे.