Mumbai Sakinaka Case:संतापाची लाट उसळली! संतप्त प्रतिक्रिया,पीडितेच्या मृत्यूनंतर विरोधी पक्ष आक्रमक
Continues below advertisement
Mumbai Rape Case : मुंबईतील उपनगर साकीनाका येथे एका टेम्पोत 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना काल समोर आली होती. या संतापजनक घटनेतील पीडितेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी सांगितलं की, राजावाडी हॉस्पिटलमध्ये पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आता सर्व स्तरांतून होत आहे.
Continues below advertisement