Mumbai | सुरक्षा वाढवण्याबाबत सचिन तेंडुलकर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला | ABP Majha
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि लिटल मास्टर सुनिल गावसकर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीच मागचं कारण सुरक्षाव्यवस्थेत करण्यात आलेल्या कपातीचं असल्याची माहिती मिळत आहे. नव्या सरकारनं काही लोकांची सुरक्षा कमी केली आहे. त्यात सचिन तेंडुलकरचा समावेश आहे. आपली सुरक्षा वाढवण्यात यावी अशी मागणी सचिनने मुख्यमंत्र्यांकडे केल्याची चर्चा आहे.