Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची कोसळधार; सायनच्या किंग्ज सर्कल परिसरात पाणी साचलं
मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात जोरदार सरींची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, "दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या राज्यात पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. यानुसार 15 ते 17 जुलैपर्यंत कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे."