Loan Waiver | कर्ज घेतलंच नाही तर कर्जमाफीचा प्रश्नच नाही : रितेश देशमुख | ABP Majha
Continues below advertisement
"मी किंवा माझ्या भावाने कर्जच घेतलं नाही. त्यामुळे कर्जमाफीचा प्रश्नच येत नाही. शिवाय व्हायरल होणारे कागदपत्रे बनावट आहेत," असं उत्तर अभिनेता रितेश देशमुखने मानवाधिकार संघटना मानुषीच्या संस्थापक आणि प्रोफेसर मधू पौर्णिमा किश्वर यांना दिलं आहे. मधू किश्वर यांनी अभिनेता रितेश आणि त्यांचे बंधू आमदार अमित देशमुख यांनी 4 कोटी 70 लाखांच्या कर्जमाफीचा लाभ घेतल्याचा आरोप केला होता. याच आरोपांना रितेशने ट्वीटच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियात रितेश आणि अमित देशमुख बंधूंचा सात-बारा उतारा त्यावरील कर्जाच्या नोदींसह वायरल होत आहे. मधू किश्वर यांनी हीच इमेज रितेश देशमुख यांना टॅग करुन प्रश्न विचारला होता. परंतु ते ट्वीट मधू किश्वर यांनी डिलीट करुन रितेशची माफी मागितली आहे.
Continues below advertisement