Arvind Inamdar | राज्याचे माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांचं निधन | ABP Majha
महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचं दीर्घआजाराने निधन झालं. मुंबईतील हरकिसनदास रुग्णालयात पहाटे अडीचच्या सुमारात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 79 वर्षांचे होते. मंत्रालयाजवळील शलाका या निवासस्थानी त्यांचं पार्थिव सकाळी 9.30 ते 10.30 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. तर मरीन लाईनमधील चंदनवाडी इथे सकाळी अकरा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.