Kanjurmarg Metro Car Shed | कांजूरमार्गची जागा आमचीच, केंद्रानंतर राज्य सरकारचाही दावा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Nov 2020 01:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मेट्रो कारशेडसाठी आरेच्या जागेला पर्याय म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कांजूरमार्गच्या जागेची घोषणा केली. परंतु आता या जागेवर केंद्र सरकारने दावा केल्याचं वृत्त आहे. ही जागा आपल्या मालकीची असून ती एमएमआरडीएला हस्तांतरित करण्याचा निर्णय रद्द करण्याची सूचना केंद्र सरकारने राज्य सरकारला केली आहे. लोकसत्ता या वृत्तपत्राने हे वृत्त प्रकाशित केलं आहे. केंद्र सरकारच्या या भूमिकेमुळे मेट्रो कारशेडच्या जागेवरुन केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष होण्याची शक्यता आहे. दरम्यान ही जागा राज्या सरकारच्याच मालकीची आहे. असे अडथळे येण्याची शक्यता गृहित धरुनच जागा हस्तांतरित करण्यापूर्वी पुरेशी काळजी घेतली, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.