Mumbai Rains Traffic | पाऊस आणि खड्ड्यांमुळे वाहतूक ठप्प मुंबईकरांवर दुहेरी संकट

मुंबईत सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर, विशेषतः वाकोला उड्डाणपूल आणि सांताक्रूझ उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे शहरात प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. ही वाहतूक कोंडी थेट अंधेरी ते जोगेश्वरीपर्यंत पसरली आहे. काही मिनिटांत कापला जाणारा रस्ता पूर्ण करण्यासाठी तासाभरापेक्षा जास्त वेळ लागत असल्याचे चित्र आहे. या वाहतूक कोंडीत एक अँब्युलन्स देखील अडकली होती. पश्चिम द्रुतगती महामार्ग हा मुंबईतील अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे, ज्यावरून दररोज लाखो वाहने प्रवास करतात. पश्चिम उपनगरातील रहिवासी तसेच मीरा रोड आणि भाईंदर परिसरातील लोक दक्षिण मुंबईमध्ये जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे या महत्त्वाच्या रस्त्यावरील मोठ्या आकाराचे खड्डे मुंबईकरांसाठी दुहेरी समस्या निर्माण करत आहेत. पावसासोबतच खड्ड्यांमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मनोज जैस्वाल यांच्यासह सचिन काहार यांनी याची माहिती दिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola