Mumbai Rains | King Circle मध्ये गुडघाभर पाणी, वाहतूक ठप्प, वाहनं बंद!
किंग सर्कल परिसरात मुसळधार पावसामुळे पाणी साचले आहे. गुडघाभर पाणी असल्याने वाहनचालकांना मार्ग काढताना अडचणी येत आहेत. अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहने पाण्यात बंद पडली आहेत. वाहतूक अत्यंत संतगतीने सुरू असून, एकाच लेनमधून वाहने पुढे जात आहेत. मुंबई महापालिकेचे कर्मचारी आणि वाहतूक पोलीस परिस्थिती हाताळण्यासाठी तैनात आहेत. पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप लावण्यात आले आहेत, मात्र पाऊस सुरू असल्याने पंपही निकामी ठरत आहेत. "जोपर्यंत पाऊस कमी होत नाही, तोपर्यंत पाण्याचा निचरा करणे शक्य नाही," असे दिसून येत आहे. मॅनहोल उघडून पाणी काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घाटकोपर ते दादरकडे जाणाऱ्या मार्गावरही वाहतूक मंदावली आहे. सायन सर्कसजवळही अनेक गाड्या थांबलेल्या दिसल्या. काही वाहनचालकांच्या गाड्या बंद पडल्याने त्यांना पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे.