Mumbai Rains: कुर्ल्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं, कुर्ला परिसरातून आढावा
मुंबईसह उपनगरात आज मान्सूनचं दमदार आगमन झालंय. पहिल्याच पावसाने शहरात दाणादाण उडाली असून जनजीवन विस्कळीत झालंय. ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत पावसाच्या सरी कोसळत आहेत. मुंबईतील पश्चिम उपनगरं म्हणजेच, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव या उपनगरांमध्ये दमदार पाऊस बरसतोय. तर मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूर या परिसरातही पावसाची रिमझिम सुरु असून अधूनमधून जोरदार सरीही कोसळत आहेत.