Mumbai Rains : मुंबईसह उपवनगरात मुसळधार; मरीन ड्राईव्ह परिसरातून ग्राऊड रिपोर्ट
हवामान खात्यानं वर्तलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर आणि उपनगरांत पावसानं जोरदार हजेरी लावलीय. त्यात मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये दुपारी १ पर्यंत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मुलुंड, भांडुप, ठाणे, कल्याण, नवी मुंबईत मुसळधार पाऊस बरसणार आहे. पश्चिम उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. दरम्यान सकाळपासून अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, विलेपार्ले, सांताक्रुझ, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर या पश्चिम उपनगरांमध्ये जोरदार सरी बरसताहेत. तर, वडाळा-चेंबूर भागातही मुसळधार पाऊस बरसत असल्यानं चेंबूरमधील सखल भागात पावसाचं पाणी साचलंय.. त्यातच सकाळी १० च्या सुमारास समुद्रालाही उधाण आलं. दरम्यान मुंबईतल्या काही भागात पावसाचा जोर वाढला असला तरी लोकल आणि रस्ते वाहतूक सुरळीत आहे.. तरी, हवामान खात्याकडून आज मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.