Mumbai Rains : वसई, विरार, नालासोपाऱ्यात पहाटेपासून पावसाच्या सरी ; आचोले रस्ता पूर्णपणे पाण्याखाली

Continues below advertisement

मुंबईशेजारील वसई-विरार, नालासोपाऱ्यात पहाटेपासून कधी रिमझिम तर कधी पावसाच्या जोरदार सरी बरसताहेत. पहाटेपासून पडणाऱ्या पावसानं नालासोपाऱ्यातला आचोले रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेलाय. इथे गुडघाभर पाणी साचलंय. सकाळच्या वेळेत कामावर जाणाऱ्या वाहनधारकांना गुडघाभर पाण्यातून मार्ग काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागतेय. त्यात वाहन रस्त्यातच बंद पडत असल्यानं वाहतूककोंडीही होतेय. तरी, सध्या लोकलसेवा सुरळीत आहे. विरारच्या विवा कॉलेज रोड, वसई दिवणामान, दीनदयाळ नगर, सातीवली परिसरातही पावसाचं पाणी साचलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram