HSC Result : पावसामुळे निकालाच्या कामात अडचणी, वेळ वाढवून देण्याची शिक्षकांची मागणी
बारावीचा निकाल तयार करण्याचे काम सुरु असताना मागील तीन ते चार दिवसापासून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे निकालाच्या कामात अडचणी येत असून त्यासाठी आणखी चार-पाच दिवस वाढवून द्यावेत अशी मागणी शिक्षकांच्या वतीने करण्यात आली आहे.