Mumbai Rains : पावसात नसतं धाडस नको; वसई, बेलापूर, शिळफाटा परिसरात कार पाण्यात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Jul 2021 02:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं अनेक वाहनांना जलसमाधी मिळाली आहे.... वसईत पावसाच्या पाण्यात वाहून चाललेल्या कारला बाहेर काढण्यात स्थानिकांना यश आलंय. वसईत सनसिटी रोडवर कंबरेऐवढं पाणी साचलं होतं. मात्र एकानं नसती उठाठेव करत साचलेल्या पाण्यात कार चालवण्याचं नसतं धाडस दाखवलं. गाडी रस्ता सोडून जात असल्याचं समजताच स्थानिकांनी धाव घेत कारला बाहेर काढलं, तर तिकडे बेलापूर गावात तलावाच्या बाजूनं कार वळवताना पाण्याचा अंदाज न आल्यानं एक कार तलावात पडली. सुदैवानं कारमधील तिघांनी लगेच बाहेर उड्या टाकल्या त्यामुळे जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या मदतीनं कार पाण्यातून बाहेर काढण्यात आली आहे.