Worli BDD Chawl Rain : मुसळधार पावसामुळे मुंबईतील बीडीडी चाळीत पाणी, जिन्यांवर धबधबासदृश स्थिती

Continues below advertisement

मुसळधार पावसामुळं काल मुंबईत मृत्यूतांडव पाहायला मिळालं. दरड आणि भिंत कोसळण्याच्या वेगवेगळ्या दुर्घटनेत 30 जणांना जीव गमवावा लागला. पावसाचं हे रौद्र रुप पाहुन मुंबईसह लगतच्या शहरांची  झोप उडाली असतानाच, आज मुंबईसह कोकणाला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आज  रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलाय. तर 19 ते 22 जुलै या कालावधीसाठी मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तिकडे सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सातारा, सांगली, नांदेड, बीड, जालना, औरंगाबाद, नाशिक, धुळे, जळगाव आणि परभणीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram