Mumbai Rain Traffic Jam : पूर्व द्रुतगतीवर वाहतूक कोंडी,कोपरी ते मुलुंड टोलनाका,घाटकोपर छेडा नगर जॅम
Mumbai Rain Traffic Jam : मुंबईत सध्या मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात झालीये. कोपरी ब्रीज ते मुलुंड टोल नाका पर्यंत, भांडुप पंपिंग, ऐरोली सिग्नल जवळ, घाटकोपर रमाबाई नगर ते छेडा नगर, सुमन नगर इथे काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.