Mumbai Railway Platform Ticket : रेल्वे स्थानकांतील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी फलाट तिकिटात वाढ

Mumbai : दिवाळीसाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गर्दी सध्या मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानकांवर आहे. ही स्थिती लक्षात घेता रेल्वे स्थानकांतील गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी मध्य रेल्वेने प्रमुख स्थानकांवर पुढील १० दिवसांसाठी फलाट तिकीट दरात पाच पट वाढ केली आहे. यामुळे १० रुपयांच्या फलाट तिकिटासाठी ५० रुपये मोजावे लागणार आहे..मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), लोकमान्य टिळक टर्मिनस(Lokmanya Tilak Terminus), दादर (Dadar) तसेच ठाणे (Thane), कल्याण (Kalyan) आणि पनवेल (Panvel)या सहा स्थानकांसाठी हे फलाट तिकीट दर लागू असणार आहेत. आजपासून ३१ ऑक्टोबरपर्यंत हे दर आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola