Mumbai Railway : हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक, पनवेल ते कुर्ला विशेष लोकल चालवणार : ABP Majha

मुंबईकरांनो ही बातमी खास तुमच्यासाठी... आज रविवार आहे... आणि मुंबईच्या तीन मार्गांवर आज मेगाब्लॉक आहे... मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.. या ब्लॉक दरम्यान CSMT ते पनवेल आणि CSMT  ते वांद्रे हे दोन्ही मार्ग पूर्णपणे बंद राहतील. पनवेल, बेलापूर, वाशीहून ज्यांना CSMT कडे जायचं आहे, त्यांच्यासाठी कुर्ल्यापर्यंत दर २० मिनिटांनी विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत. कुर्ल्याहून ट्रेन बदलून मध्य रेल्वेवरून प्रवास करण्याची मुभा असेल. तर मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप आणि डाऊन फास्ट मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे अनेक फास्ट ट्रेन स्लो मार्गावरून वळवल्या जातील, तर काही फास्ट ट्रेन्स रद्द करण्यात येतील.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola