Mumbai Pune Sinhagad Express:मुंबई-पुणेदरम्यान धावणाऱ्या सिंहगड एक्सप्रेसमध्ये प्रवाशांमध्ये हाणामारी
Continues below advertisement
बातमी सिंहगड एक्स्प्रेसमधल्या कुस्तीची.. मुंबई-पुणेदरम्यान धावणाऱ्या सिंहगड एक्सप्रेसमध्ये प्रवाशांमध्ये जागेच्या मुद्द्यावरून जोरदार हाणामारी झालीय..सिंहगड एक्सप्रेस बुधवारी सकाळी चिंचवड स्टेशनवर आली असता काही प्रवाशांमध्ये जागा पकडण्यावरून वाद सुरू झाला. हा वाद पुढे इतका वाढला की प्रवाशांमध्ये यावेळी जोरदार हाणामारी सुरु झाली. अगदी काही प्रवासी डब्यात खाली पडेपर्यंत ही हाणामारी झाली. डब्यात उपस्थित इतर प्रवाशांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद थांबला. या वादानंतर आता पुन्हा एकदा पिंपरी आणि चिंचवडसाठी वेगळ्या बोगीची मागणी होताना दिसत आहे.
Continues below advertisement