Bhandup Pipeline Burst : भांडूपमध्ये जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाण्याची नासाडी

भांडुप मधील संभाजी चौक परिसरामध्ये 900 एम एम व्यासाची जलवाहिनी  फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया तर गेलेच सोबत पुढील एक ते दोन दिवस विक्रोळी, कांजुर भांडुप,घाटकोपर मधील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा खंडित राहणार आहे. ही पाईपलाईन फुटण्याची आतापर्यंतची ही चौथी वेळ आहे.  महिनाभरापूर्वी सह्याद्री नगर परिसरात हीच पाईपलाईन फुटल्यामुळे तब्बल चार दिवस या परिसरामध्ये पाणीपुरवठा खंडित झाला होता आणि नागरिकांना चार दिवस पाण्याअभावीच काढावे लागले होते. याहूनही कहर म्हणजे मुंबई महानगरपालिकेकडून ही पाईपलाईन फुटल्यानंतर पाण्याची कुठलीही पर्यायी व्यवस्था केली गेली नाही सोबतच पाणीपुरवठा किती दिवस खंडित राहील याची माहिती देखील नागरिकांना मिळाली नव्हती. त्यामुळे पुन्हा एकदा आज ही पाईपलाईन फुटल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.  दरम्यान आज ही पाईपलाईन फुटल्यानंतर संभाजी चौक चा परिसर जलमय झाला होता. पाणीपुरवठा खंडित केल्यानंतर या परिसरातील पाणी ओसरले.मात्र आता मुंबई उपनगराच्या एस आणि टी वॉर्ड च्या हद्दीत मोठ्यां प्रमाणत पाणी बाणी सुरू झाली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola