Mumbai-Pune ExpressWay : आज मुंबई-पुणे प्रवास करताय? एक्स्प्रेस वेवर आज ट्रॅफिक ब्लॉक
Continues below advertisement
Mumbai-Pune Express Way Update: शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघाती मृत्यूनंतर पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ITMS प्रकल्प राबवण्यास सुरुवात होत आहे. यासाठी आज द्रुतगती मार्गावर दोन तासांचा ब्लॉक घेतला जात आहे. ITMS प्रकल्पाचा एक भाग म्हणजे ओव्हरहेड ग्रॅंटी. तीच उभारण्यासाठी आज दुपारी 12 ते 2 दरम्यान हा ब्लॉक घेतला जात आहे. किवळे ते सोमटने दरम्यान हे काम सुरू होत आहे. या दोन तासासाठी जुन्या पुणे मुंबई-महामार्गाकडे वाहतूक वळवली जाणार आहे.
Continues below advertisement