Mumbai Local | उद्यापासून सर्वांना लोकलमध्ये एन्ट्री; रेल्वे प्रशासन कितपत सज्ज?
मुंबई : कुठे इंडिकेटर दुरुस्ती सुरु आहे, तर कुठे स्टेशन सॅनिटायझेशनचं काम सुरु आहे. ही सर्व तयारी सुरु आहे, 1 फेब्रुवारीसाठी... कारण एक फेब्रुवारीला मुंबईकरांसाठी सर्वात मोठा दिवस असणार आहे. याच दिवशी तब्बल दहा महिन्यांनंतर मुंबईकरांना लोकलची दारं खुली करण्यात येणार आहेत. त्यादिवशी रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेऊन रेल्वेनं पूर्वतयारी सुरु केली आहे. "कमी प्रवासी असल्यामुळे आम्ही काही तिकीट खिडक्या, पादचारी पूल आणि लिफ्ट बंद ठेवल्या होत्या. आता मात्र त्या पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरु करत आहोत", असं मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितलं आहे.