शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून अभिनेत्री कंगना रनौतविरोधात विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव
Continues below advertisement
मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी अभिनेत्री कंगना रनौतवर गंभीर आरोप करत विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडल्याचा आरोप कंगनाने केला होता. याविरोधात प्रताप सरनाईक यांनी आक्रमक भूमिका घेतली असून हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. ज्या पाकिस्तानचं जगात क्रेडिट नाही त्यांचं क्रेडिट कार्ड घेऊन मी काय करु? असा सवालही यावेळी सरनाईक यांनी केला आहे.
सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, अभिनेत्री कंगनाने एक ट्विट केलं होतं, ज्यामध्ये मुंबईत आल्यानंतर तोंड फोडण्याची गोष्ट करणाऱ्यांच्या घरी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडलं आहे. तिच्या ट्विटच्या आधारे अनेकांनी बातम्या केल्या. ईडीच्या कोणत्याही अधिकाऱ्याने घरी काय सापडलं याची माहिती दिलेली नाही. कंगनाकडून अशा पद्धतीचं बदनामी करणं चुकीचं आहे, असं सरनाईक म्हणाले.