City Bank Scam | सिटी बँक खातेदारांची शिवसेनेविरोधात पोस्टरबाजी | ABP Majha
Continues below advertisement
सिटी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी न्याय मागत मुंबईत शिवसेनाविरोधी पोस्टरबाजी करण्यात आली आहे. मातोश्री, सेनाभवन, मंत्रालयाबाहेर हे पोस्टर्स लावण्यात आलेत.सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावर कारवाई होणार का असा सवाल खातेधारकांनी मुख्यमंत्र्यांना विचारला गेलाय. तर, खातेधारकांचे पैसे वाचवण्यासाठी सिटी बँकेचं राज्य सहकारी बँकेत विलीनीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आलंय. तो प्रस्ताव रिझर्व्ह बँकेनं मान्य केल्यास महिन्याभरात खातेदारांना त्यांचे पैसे परत मिळतील, अशी माहिती आनंदराव अडसूळ यांनी माझाशी बोलताना दिलीय.
Continues below advertisement