Siddheshwar Temple Yatra | सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यात्रेला सुरुवात | ABP Majha
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यात्रेला आजपासून सुरुवात होतेय. विधीवत पूजा करून तैलाभिषेक करण्यात येईल. नंदीध्वज पूजन झाल्यानंतर सोलापुरातील 68 लिंगाना प्रदक्षिणा घालून नंदीध्वज सिदेश्वर मंदिरात अमृत लिंगाजवळ पोहोचतील. या सोहळ्यासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे उपस्थित आहेत. यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येने सोलापुरात दाखल झालेत. यात्रेनिमित्त कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय.