Mumbai Police : अपहरण झालेल्या मुलीचा तीन तासात शोध, मुंबई पोलिसांची कामगिरी
Continues below advertisement
मुंबईत अपहरण झालेल्या तीन महिन्यांच्या मुलीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय. या प्रकरणी एका आरोपीलाही अटक करण्यात आलीय. झेव्हिअर कॉलेजसमोर फुटपाथवर राहणाऱ्या कुटुंबाची 3 महिन्यांची मुलगी 26 ऑक्टोबरला बेपत्ता झाली होती. बाळाची चोरी करतानाचा सीसीटीव्ही व्हीडिओ पाहून पोलिसांनी तपास सुरु केला. 8 पथकं तयार करून काही तासांतच पोलिसांनी मुलीचा छडा लावला.
Continues below advertisement