Jalna Raid : जालना शहरातील पाच ते सहा होलसेल दुकानावर धाडी टाकत कारवाई
Continues below advertisement
गेल्या काही महिन्यांपासून जालन्यातील व्यापारी कधी आयकर तर कधी जीएसटी विभागाच्या रडारवर आहेत.आज जालन्यात पुन्हा जीएसटी विभागाच्या पथकांनी जुना मोठा परिसरात असलेल्या होलसेल दुकानावर धाडी टाकत कारवाई केली.. कारवाईमुळे व्यापारी वर्गात एकच खळबळ उडालीय... जालना शहरातील पाच ते सहा होलसेल दुकानावर 25 ते 30 अधिकाऱ्यांच्या पथकांनी धाडी टाकल्या.... अधिकाऱ्यांनी धाडी दरम्यान बिला सह काही कागद पत्रही ताब्यात घेतल्याची माहिती समोर आलीय.
Continues below advertisement