Segways to Mumbai Police | गस्तीसाठी मुंबई पोलिसांना सेगवे, वरळी सी फेसवर रंगीत तालीम
Continues below advertisement
मुंबई पोलिसांच्या गस्तीसाठी नवी यंत्रणा सज्ज झाली आहे. वरळी सी फेस वर गस्त घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी सेगवे म्हणजेच स्वयंमसंतुलीत विद्युत स्कूटर देण्यात आली आहे. ही स्कूटर ताशी 20 किमी गतीने धावू शकते. एकदा चार्जिंग केल्यानंतर कमीत कमी 25 किमी ही स्कूटर धावू शकेल. या यंत्रणेचे उद्घाटन 1 जानेवारीला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, अभिनेता अक्षय कुमार, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह इत्यादींच्या उपस्थितीत पार पडणार आहे. वरळी सी फेसवर या सेगवे चालवण्याची रंगीत तालीम पार पडली.
Continues below advertisement