Mumbai Police Bappa : मुंबईतील पोलीस अधिकाऱ्याच्या घरी साकारले 'पोलीस बाप्पा' | ABP Majha

Continues below advertisement

सगळीकडे गणेशोत्सवाचा उत्साह सुरू आहे. त्यात अनेक गणेश मंडळांमध्ये व घरगुती वेगवेगळ्या पद्धतीनं तयार करण्यात आलेल्या गणपतीच्या मूर्ती विराजमान झाल्यानं भक्तांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.मुंबईच्या अंधेरी पूर्वेत एका पोलीस अधिकाऱ्याच्या घरी पोलीस बाप्पाचा आगमन झाला आहे. पोलीस वेशातील गणपती आणून समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी विलेपार्ले पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस इन्स्पेक्टर राजेंद्र काळे यांच्या प्रयत्न आहे. गेल्या चार वर्षापासून पोलिस ऑफिसर राजेंद्र काळे आपल्या घरी पोलीस बाप्पा बसवत आहेत. मात्र यावर्षी कोरोना काळामध्ये पोलिसांसोबत covid-19 वॉरियर म्हणून काम केलेले डॉक्टर नर्सेस ॲम्बुलन्स चालक व सफाई कर्मचारी या सर्वांचं देखावा देखील या पोलिस बाप्पाच्या समोर केला गेला आहे. दरवर्षी पोलीस इन्स्पेक्टर राजेंद्र काळे यांच्या घरी इन्स्पेक्टर रैंकच्या पोलीस बाप्पाचा आगमन व्हायचं मात्र या वर्षी कोरोना काळामध्ये केलेल्या कामाचे कौतुक म्हणून पोलीस बाप्पाचा प्रमोशन म्हणून आयपीएस ऑफिसर पोलिस बाप्पा चा आगमन झाला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram