ATM Crime : एटीएम मशिनवर प्लास्टिकची पट्टी लावून नागरिकांना फसवलं, पोलिसांकडून टोळी गजाआड
Continues below advertisement
मुंबईत एटीएम मशिनवर प्लास्टिकची पट्टी लावून नागरिकांना फसवणाऱ्या टोळीला मालाड पोलिसांनी अटक केली आहे. ही टोळी एटीएम मशिनवर पट्टी प्लास्टिकची लावून, पैसे काढण्यासाठी ग्राहक आल्यावर त्या एटीएमच्या बाहेर थांबायची. प्लास्टिकच्या पट्टीमुळं एटीएममधून पैसे बाहेर पडत नसत. त्यामुळं एटीएममध्ये बिघाड आहे, असं समजून ग्राहक तिथून निघून जायचे. त्यानंतर हे चोरटे प्लास्टिकची पट्टी काढून एटीएममध्ये अडकलेली रक्कम काढून घेत होते. त्यामुळं अनेक ग्राहकांची फसवणूक झाल्याचं उघडकीस आलं आहे. एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर ही सारी घटना रेकॉर्ड झाल्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई पोलिसांनी या टोळीतील दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांवर मुंबई आणि पुण्यात मिळून सहा गुन्हे दाखल आहेत.
Continues below advertisement