Mukesh Ambani : उद्योगपती मुकेश अंबानींना धमकीचे मेल करणाऱ्याला अटक; तेलंगणामधून बेड्या

Continues below advertisement

Death Threat to Mukesh Ambani : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना धमकीचे ईमेल करणाऱ्याला अखेर अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आरोपीला तेलंगणामधून अटक केली आहे. आरोपीनं मुकेश अंबानींना तब्बल 5 ईमेल करत धमकी दिली होती. तसेच, आधी 20, नंतर 200 आणि त्यानंतर 400 कोटी रुपयांची मागणीही आरोपीनं केली होती. गणेश वानपारधी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. 8 नोव्हेंबरपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

27 ऑक्टोबर रोजी मुकेश अंबानींच्या ईमेल अकाऊंटवर एक मेल आला होता. ज्यामध्ये त्यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीनं मुकेश अंबानी यांच्याकडे 20 कोटी रुपयांची मागणी केली होती आणि जर पैसे दिले नाहीत, तर जीव गमवावा लागेल, असं म्हटलं होतं. तो ईमेल मिळाल्यानंतर, मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा प्रभारींच्या तक्रारीच्या आधारे, गावदेवी पोलिसांनी आयपीसीच्या कलम 387 आणि 506 (2) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. पहिल्यांदा आरोपीनं 20 कोटी तर दुसऱ्यांदा 200 कोटीची मागणी केली होती. त्यानंतर आरोपीनं तिसरा ईमेल करत 400 कोटी रुपयांची मागणी आरोपींनी केली होती. अखेर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram