New Zealand vs Pakistan : बंगळुरुत झालेल्या मुसळधार पावसाचा विश्वचषकात न्यूझीलंडला मोठा फटका
PAKबंगळुरुत झालेल्या मुसळधार पावसाचा विश्वचषकात न्यूझीलंडला मोठा फटका बसला आहे. बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवरचा न्यूझीलंड-पाकिस्तान सामना पावसाच्या व्यत्ययामुळं अर्ध्यावरच रद्द करण्याची वेळ आली. पण या सामन्यात न्यूझीलंडनं सहा बाद ४०१ धावांचा मोठा डोंगर रचूनही, डकवर्थ लुईस सिस्टिमनुसार पाकिस्तानला विजयी घोषित करण्यात आलं आहे. या सामन्यात पावसाच्या पहिल्या व्यत्ययानंतर पाकिस्तानला ४१ षटकांत विजयासाठी ३४२ धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. त्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्ताननं २४ षटकं आणि तीन चेंडूंमध्ये एक बाद २०० धावांची मजल मारली होती. त्याचवेळी या सामन्यात पावसाचा दुसऱ्यांदा व्यत्यय आला. त्यामुळं डकवर्थ लुईस पद्धतीनुसार पाकिस्तानला विजयी घोषित करण्यात आलं. त्यावेळी पाकिस्तान विजयी लक्ष्याच्या २१ धावांनी पुढं होतं. सलामीच्या फखर झमाननं नाबाद १२३ धावांची खेळी उभारून पाकिस्तानच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्यानं कर्णधार बाबर आझमच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी १९४ धावांची अभेद्य भागीदारी रचली. त्यात बाबर आझमचा नाबाद ६६ धावांचा वाटा होता.