Mumbai Missing School Bus : पोद्दार शाळेची बस सापडली मात्र प्रकरणाची सखोल चौकशी होणार
Continues below advertisement
Mumbai Missing School Bus : शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाणारी बस अजूनही न पोहोचल्याने पालकांची चिंता वाढली. सांताक्रूझमधील पोद्दार शाळेची ही बस आहे. शाळा सुटल्यानंतर ही बस विद्यार्थ्यांना घेऊन घरच्या दिशेने निघाली, पण अजूनही घरी पोहोचली नाही. त्यामुळे चिंतेत असलेल्या पालकांनी तातडीने शाळेकडे धाव घेतली. या स्कूल बसच्या चालकाचा मोबाइल स्वीच ऑफ येत असल्याने पालक धास्तावले होते. 'एबीपी माझा'वर वृत्त प्रकाशित होताच मुंबई पोलीस अधिकऱ्यांनी ही बस विद्यार्थ्यांसह सापडली असल्याची माहिती दिली. मात्र, या दरम्यान स्कूल बस नेमकी कुठं होती, शाळेसोबत अथवा पालकांसोबत कोणताही संपर्क का झाला नाही असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
Continues below advertisement