
Maharashtra Kesari : साताऱ्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा, पुण्यात पैलवांनाची जोरदार तयारी
Continues below advertisement
कोरोनामुळे गेले दोन वर्ष जणू काही सारं विश्वच थांबलं होतं... मात्र आता निर्बंधमुक्तीनंतर गाडा रुळावर यायला लागलाय. अशातच उद्यापासून साताऱ्यामधे महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. दोन वर्षांनंतर ही स्पर्धा होत असल्याने यावर्षी सर्व पैलवान मोठ्या तयारीनिशी फडात उतरणार आहेत, पुण्यातील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलातील पैलवांनाच्या तयारीचा आढावा घेतलाय ए बी पी माझाचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी
Continues below advertisement