Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्यांविरुद्ध तक्रार करणारा तक्रारदारच गायब

Continues below advertisement

भाजप नेते किरीट सोमय्यांविरुद्ध तक्रार करणारा तक्रारदारच गायब झालाय. सोमय्या आणि कुटुंबीयांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार बदलापूरमधील पंढरीनाथ साबळे यांनी मुंबई पोलिसांकडे केली होती. पण तक्रारदार पंढरीनाथ साबळे त्यांच्या बदलापूरच्या पत्त्यावर राहत नसल्याचं सोमय्या यांनी म्हटलंय. त्यांना लवकरात लवकर शोधा अन्यथा त्यांचा मनसुख हिरण होईल, अशी भीती सोमय्या यांनी व्यक्त केलीय. पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं साबळे यांच्या तक्रारीची चौकशी करून कोणताही गुन्हा दाखल होत नसल्याचं सांगितलं आणि क्लोजर रिपोर्ट दिला. किरीट सोमय्या यांनी आज बदलापूरात जाऊन पोलिसांकडे तक्रार दिलीय. पंढरीनाथ साबळे यांना शोधून काढा अशी मागणी त्यांनी केलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram