Temple Reopen | सर्व प्रार्थनास्थळी मास्क बंधनकारक केले पाहिजे ; मुंबईतील भाविकांच्या प्रतिक्रिया
दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारने राज्यातील जनतेला गिफ्ट दिलं आहे. दिवाळी पाडव्यापासून म्हणजेच 16 नोव्हेंबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची मंदिरं आणि प्रार्थनस्थळं उघडण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत माहिती दिली. मात्र भाविकांना यावेळी कोरोनाच्या नियमांचं म्हणजेच मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगच पालन करावं लागणार आहे.