Mumbai Peddler Arrested : अंमली पदार्थ विरोधी कक्षाची मोठी कारवाई, 125 ग्रॅम मेफेड्रोन म्हणजेच MD जप्त

Continues below advertisement

अंमली पदार्थ विरोधी कक्ष आझाद मैदान युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र दहिफळे व पथक दिनांक 23 जुलै रोजी दक्षिण प्रादेशिक विभागाअंतर्गत गस्त करीत असताना बेगमोहमद चाळ, जे जे हॉस्पिटल रोड, डोंगरी मुंबई येथे अटक आरोपी इम्रान अब्दुलअजीज खान उर्फ इम्रान जे. जे वय 42 व अब्दुल अजीम करीम साठी उर्फ अजीम बावा वय 35 वर्षे यांची संशयास्पद हालचालीवरून झडती घेतली असता त्यांचेकडुन अनुक्रमे 15 ग्रॅम एम.डी व 20 ग्रॅम एम.डी (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram