Mumbai One App | PM मोदींनी लाँच केले, एकाच तिकीटावर Multi-modal प्रवास
Continues below advertisement
पंतप्रधानांच्या हस्ते 'Mumbai One App' चे अनावरण करण्यात आले. या अॅपमुळे मुंबईकरांना प्रवासाच्या दृष्टीने मोठी सुविधा मिळणार आहे. एकाच तिकीटावर वेगवेगळ्या वाहतूक व्यवस्थेत प्रवास करणे आता शक्य होणार आहे. 'Mumbai One App' हे मल्टी-मॉडल अॅप असून, यात ११ वेगवेगळ्या वाहतूक सुविधांचा समावेश आहे. यामध्ये Local, Metro, Mono, Bus यांसारख्या सेवांचा समावेश आहे. भविष्यात Water Taxi सारख्या सुविधांची तिकीट बुकिंग देखील यातून करता येणार आहे. हे अॅप Android वापरकर्त्यांसाठी Google Play Store वर आणि Apple iPhone वापरकर्त्यांसाठी App Store वर उपलब्ध आहे. अॅप वापरण्यासाठी नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि जन्मतारीख यांसारख्या माहितीसह रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर OTP द्वारे पडताळणी केली जाते. या अॅपमध्ये Quick Ticket, Plan Journey आणि Nearby Stations असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. अक्षय भाटकर यांनी या अॅपचा आढावा घेतला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement