Sachin Ghaywal : सचिन घायवळांच्या शस्त्र परवान्यावरून जोरदार राजकीय घमासान
Continues below advertisement
पुण्यातील गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना देण्यावरून वाद निर्माण झाला आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी हा परवाना मंजूर केल्याने ते अडचणीत आले आहेत. सभापती राम शिंदेही या वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. राम शिंदेंच्या शिफारसीमुळे योगेश कदमांनी शस्त्र परवान्यावर सही केल्याचा आरोप शिवसेना नेत्यांनी केला आहे. यामुळे रोहित पवारांनी राम शिंदेंवर केलेल्या आरोपांना दुजोरा मिळाला. विरोधक योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. गृह राज्यमंत्र्यांच्या कार्यकक्षेत ढवळाढवळ केल्याने मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आल्याचे सांगत रामदास कदमांनी राम शिंदेंना लक्ष्य केले. "मी या खुर्चीवरती बसलेला असल्यापासून प्रलंबित गुन्हे किंवा गुन्हे दाखल असलेल्या एकाही व्यक्तीला माझ्याकडून लायसन्स देण्यासाठीची शिफारस झालेली नाही," असे योगेश कदम यांनी स्पष्ट केले आहे. निलेश घायवळ देशाबाहेर पळून गेला असून त्याचे गुंड थैमान घालत आहेत. पोलिसांनी शस्त्र परवाना नाकारल्यावर आमदार-खासदारांपैकी कुणीतरी गृहखात्याकडे शिफारस केली असेल, ते कोण होते हे तपासण्याची मागणीही करण्यात आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनीही या प्रकरणी टीका केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement