Mumbai North East Lok Sabha : गॅस 600 चा 1200 झालाय ठिके, लोकांची इन्कम वाढलीये का?

Continues below advertisement

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी मुंबईत जोरदार सुरू आहे.विविध मुद्यांवर आरोपप्रत्यारोप करून मुद्दे बनविले जात आहेत. ईशान्य मुंबईत देखील हिंदू- मुस्लिमसह आता मराठी आणि गुजराती वाद (Marathi Vs Gujarati Dispute In North East Mumbai) पाहायला मिळतो आहे. येत्या 20 मे रोजी ईशान्य मुंबईमध्ये निवडणूक होणार असून त्यासाठी भाजपकडून मिहिर कोटेचा तर शिवसेना ठाकरे गटाकडून संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील 6 मतदारसंघात मतदान पार पडेल. मतदानाला काहीच दिवस शिल्लक असल्याने मुंबईतील राजकीय प्रचार शिगेला पोहचला आहे. त्यात मुंबईतील 6 पैकी 3 जागांवर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना समोरासमोर आहे. 

ईशान्य मुंबईत शिवसेना ठाकरे गट विरूद्ध भाजपची लढत होणार आहे. बहुभाषिय असलेल्या या भागात पुर्नविकासाचा मोठा प्रश्न असताना या विषयाला बगल देत, सध्या या मतदार संघात मराठी विरुद्ध गुजराती तर कुठे हिंदू मुस्लिम असा वाद रंगल्याचे पहायला मिळत आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram