Corona Virus | कोरोना व्हायरस रोखणाऱ्या N95 मास्कचा मुंबईत तुटवडा
कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून एन-95 या मास्कचा वापर केला जातो. महाराष्ट्रात या मास्कचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन केलं जातं. तसंच परदेशातही मास्कची मोठ्या प्रमाणावर निर्यात देखील केली जाते. मात्र कोरोनाने भारतात शिरकाव केला असताना ऐन मुंबईतल्या औषधांच्या दुकानात एन-95 मास्क मिळेनासे झाले आहे. तसंच संधीचा फायदा घेत एन-95 मास्कच्या किंमतीतही भरमसाठ वाढ करण्यात आल्याचं कळतं.