मुंबई महापालिकेची जगातील सहा सिस्टर सिटीजकडे लसपुरवठ्याची मागणी

Continues below advertisement

मुंबई महापालिकेने जगातील सहा सिस्टर सिटीजकडे लसपुरवठ्याची मागणी केली आहे. सेंट पीटर्सबर्ग (रशिया), न्यू यॉर्क (अमेरिका), लॉस एंजेलिस (अमेरिका), बुसान (दक्षिण कोरिया), स्टुटगार्ट (जर्मनी) आणि योकोहोमा (जपान) या शहरांतील महापौरांना मुंबई महापालिकेकडून पत्रे रवाना झाली आहेत. मुंबईच्या सहा सिस्टर सिटीजसोबत वेगवेगळ्या कार्यक्रमांसंदर्भात यापूर्वी संबंध आले आहेत. तिथले अधिकारी-महापौर यांच्या भेटीगाठीही होत असतात. याच नात्याची आठवण करत कोविड काळात मदत करण्याचं आवाहन बीएमसीने केलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram