Mumbai Air Pollution : विलेपार्ले येथील प्रकल्पावर कारवाई, पालिकेचे वायूप्रदूषण नियंत्रणासाठी नियम
Continues below advertisement
Mumbai Air Pollution : प्रदूषणप्रकरणी विलेपार्ले येथील प्रकल्पावर कारवाई, पालिकेचे प्रदूषण नियंत्रणासाठी नियम...
मुंबईतील वायू प्रदुषण नियंत्रणासाठी महानगरपालिकेने लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बांधकामांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. दरम्यान विलेपार्ले भागात पहिला गुन्हा महापालिकेच्या के पश्चिम विभागाने सोमवारी दाखल केला. प्राधिकरणांना नियमावलीचे पालन करण्याचा इशारा पुन्हा देण्यात आला. नियमोल्लंघनाचे गुन्हे दाखल करताना बांधकाम कोणत्या प्राधिकरणाच्या हद्दीत आहे याचा विचार न करता सरळ गुन्हे दाखल करावेत असेही निर्देश देण्यात आलेत. आतापर्यंत नियम धुडकावणाऱ्या ३४४ बांधकामांना अशा नोटीसा जारी करण्यात आल्यात
Continues below advertisement