Mumbai Mulund Building Slab Collapsed : मुंबईतील मुलुंडमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला
Mumbai Building Slab Collapsed : मुंबईतील (Mumbai) मुलुंड (Mulund) इथल्या नाणेपाडा परिसरातील मोतीछाया इमारतीच्या घरातील स्लॅब कोसळला आहे. या दुर्घटनेत दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या इमारतीमध्ये दोन कुटुंब वास्तव्याला होती. 'ग्राउंड प्लस टू' असं या इमारतीचं स्ट्रक्चर होतं. विशेष म्हणजे, ही इमारत पालिका प्रशासनाकडून धोकादायक म्हणून घोषित केली होती. तरीदेखील काही कुटुंबं या इमारतीमध्ये वास्तव्याला होतं. या दुर्घटनेनंतर या इमारतीमधून सर्व कुटुंबाचं स्थलांतर करण्यात आलं आहे.