Agitation for Marathi | दुकानदाराकडून राज्याच्या अस्मितेला धक्का देण्याचा प्रयत्न : अरविंद सावंत

मराठीत बोलण्याची मागणी केल्याने दुकानदाराने अपमान केला म्हणून मुंबईतील कुलाबा परिसरात एका लेखिका गुरुवारी (8 ऑक्टोबर) दुपारपासून दुकानाबाहेर रस्त्यावर ठिय्या देऊन बसली आहे. शोभा रजनीकांत देशपांडे असं या लेखिकेचं नाव असून त्या कुलाब्यातच राहतात. मराठीत बोलण्याची मागणी केल्याने ज्वेलरने अपमानास्पद वागणूक देत दुकानाबाहेर ढकलून दिल्याचा आरोप या लेखिकेने केला आहे. मराठीत बोलल्यामुळे ज्वेलरने त्यांना दागिने विकण्यास नकार दिला, हा प्रकार म्हणजे राज्याच्या संस्कृतीला, अस्मितेला धक्का देण्यासारखं आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी दिली 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola