Mumbai Mono : लवकरच दर 5 मिनिटांनी 'मोनो' धावणार! हैदराबादच्या कंपनीला 10 नव्या मेट्रो ट्रेनचं टेंडर
Continues below advertisement
मोनोरेलच्या ताफ्यात आता 10 नवीन गाड्यांची भर पडणार आहे. त्यामुळे आता 18 मिनिटांऐवजी दर 5 मिनिटांनी मोनो धावणार आहे. जानेवारी 2023 ते जानेवारी 2024 या काळात या नवीन मोनो ट्रेन्स दाखल होणार आहेत. त्यासाठी मेधा सर्व्हो ड्राइव्हज या कंपनीला कंत्राट देण्यात आलं आहे. या ट्रेन्ससाठी सुमारे 590 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. नव्या डब्यांची अनेक वैशिष्ट्यं आहेत.)) ((या नवीन मोनोचा वेग आधीच्या गाड्यांच्या तुलनेत जास्त असून त्या वजनाला हलक्या आहेत. शिवाय या मोनो मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत बनवण्यात येत असल्यामुळे त्यांच्या देखभालीचा खर्च तुलनेने कमी असणार आहे.
Continues below advertisement