MNS Morcha | फेरीवाला धोरणाविरोधात मनसेचा एल्गार, मुंबई महापालिकेच्या जी वॉर्डवर मोर्चा | ABP Majha
फेरीवाला धोरणाविरोधात आज मनसेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आलाय. मुंबईत मनसेचे कार्यालय राजगड ते जी वॉर्डपर्यंत हा मोर्चा असणार आहे. महापालिकेच्या नव्या फेरीवाला धोरणानुसार मनसेचं कार्यालय असलेल्या राजगडाबाहेर १०० फेरीवाल्यांना बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविरोधात मनसे आक्रमक झालीय. फेरीवाल्यांच्या नव्या झोनमुळे फेरीवाल्यांना हुसकावून लावणाऱ्या मनसेला आता रोजच फेरीवाल्यांना कार्यालयाबाहेरच बघावं लागणार आहे.