Agitation for Marathi | मराठीसाठी लेखिकेचा ठिय्या, मराठीचा अपमान करणाऱ्यावर कारवाई करावी : राम कदम

मराठीत बोलण्याची मागणी केल्याने दुकानदाराने अपमान केला म्हणून मुंबईतील कुलाबा परिसरात एका लेखिका गुरुवारी (8 ऑक्टोबर) दुपारपासून दुकानाबाहेर रस्त्यावर ठिय्या देऊन बसली आहे. शोभा रजनीकांत देशपांडे असं या लेखिकेचं नाव असून त्या कुलाब्यातच राहतात. मराठीत बोलण्याची मागणी केल्याने ज्वेलरने अपमानास्पद वागणूक देत दुकानाबाहेर ढकलून दिल्याचा आरोप या लेखिकेने केला आहे. मराठीचा अपमान करण्यासाठी कोणी धजावणार नाही, अशा प्रकारचा बडगा सरकारने उचलण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते राम कदम यांनी दिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola